अतिरिक्त विशेष गाड्यांच्या सेवांचा विस्तार ;

अतिरिक्त विशेष गाड्यांच्या सेवांचा विस्तार

मध्य रेल्वेने पुढील अतिरिक्त विशेष गाड्यांचा कालावधी (सेवा) वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

अ) 01441 पुणे – लखनऊ विशेष (बुधवार) दि. ५.५.२०२१ पर्यंत आणि
01442 लखनऊ – पुणे विशेष (शुक्रवार) दि. ७.५.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

ब) 01119 लोकमान्य टिळक टर्मिनस – लखनऊ विशेष (गुरुवार) दि. ६.५.२०२१ पर्यंत आणि
01120 लखनऊ- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (शनिवार) दि. ८.५.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

क) 01445 पुणे – भागलपूर विशेष (गुरुवार) दि. ६.५.२०२१ पर्यंत आणि
01446 भागलपूर – पुणे विशेष (शनिवार) दि. ८.५.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

ड) 01203 लोकमान्य टिळक टर्मिनस – भागलपूर विशेष (शुक्रवार) दि. ७.५.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
01204 भागलपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (रविवार) दि. ९.५.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

इ) 01453 पुणे – गोरखपूर विशेष (शुक्रवार) दि. ७.५.२०२१ पर्यंत आणि
01454 गोरखपूर – पुणे विशेष (रविवार) दि. ९.५.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

ई) 01091 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – दानापूर विशेष (द्वि-साप्ताहिक) दि. १०.५.२०२१ पर्यंत आणि
01092 दानापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (द्वि-साप्ताहिक) दि. ११.५.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

उ) 01153 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – दानापूर स्पेशल (द्वि-साप्ताहिक) दि. ८.५.२०२१ पर्यंत आणि
01154 दानापूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (द्वि-साप्ताहिक) दि. ९.५.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

ऊ) 01101 दादर – मंडुवाडीह विशेष (रविवार, बुधवार, गुरुवार, शनिवार) दि. ९.५.२०२१ पर्यंत आणि
01102 मंडुवाडीह – दादर विशेष (मंगळवार, शुक्रवार, शनिवार, सोमवार) दि. ११.५.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

ए) 01163 लोकमान्य टिळक टर्मिनस – दानापूर (द्वि-साप्ताहिक) दि. ७.५.२०२१ पर्यंत आणि
01164 दानापूर- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (द्वि-साप्ताहिक) दि. ८.५.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

ऐ) 04155 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कानपूर विशेष (द्वि-साप्ताहिक) दि. ९.५.२०२१ पर्यंत आणि
04156 कानपूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (द्वि-साप्ताहिक) दि. ७.५.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

या विशेष गाड्यांच्या संरचनेत, थांब्यांमध्ये आणि वेळेमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

आरक्षणः छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर आणि पुणे येथून सुटणार्‍या पूर्णपणे आरक्षित असलेल्या विशेष गाड्यांच्या विस्तारित फे-यांचे विशेष शुल्कासह बुकिंग दि. २९.४.२०२१ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावरील सुरू .

विशेष गाड्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा.
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी सीओव्हीआयडी 19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *