भुसावळ शहरातील कापड दुकान मालकासह ग्राहकांवर दंडात्मक कारवाई ; ५ हजार दंड व ग्राहकांकडून २ हजार दंड वसूल ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील खडका रोड भागातील ग्रीन पार्क जवळील कापड दुकानामध्ये जिल्ह्याधिकाऱ्यांच्या आदेशांचे उल्लंघन करीत
रमजान निमित्त ग्राहक कपड्यांची खरेदी करीत असल्याची गोपनीय माहिती बाजारपेठचे पोलीस निरीक्षकांना मिळाल्यावरुन त्वरीत घटनास्थळी पथक रवाना करून कापड दुकान मालकासह ग्राहकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
, सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने १ मे २०२१ पर्यत लॉकडाउन घोषित करण्यात आला होता.आता लॉकडाउनमध्ये १५ मे पर्यत वाढ करण्यात आली आहे.जीवनावश्यक वस्तू वगळता सकाळी ७ ते११ वाजेचा वेळ आस्थापनांना देण्यात आलेला असून जिल्ह्याधिकाऱ्यांच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर पोलीस व नगरपरिषद प्रशासन मिळून कारवाई दंडात्मक कारवाई करीत आहे.
शहरातील खडका रोड भागातील ग्रीन पार्क जवळील बॉम्बे कलेक्शनचे दिनांक २८/०४/२०२१ रोजी रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास सुरू असल्याची माहिती बाजारपेठ पोलिस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत व सपोनि अनिल मोरे यांना मिळल्यावरून घटनास्थळी पोना दिपक पाटील, पोशी प्रणय पवार,होमगार्ड शक्ती चंदेले,प्रितम कीर्तिकर रवाना झाले असता ईदच्या सणासुदीच्या पाश्वभूमीवर ग्राहक कपड्यांची खरेदी करतांना दुकानात मिळून आल्याने बॉम्बे कलेक्शनचे दुकान मालक रहीम खाटीक यांच्याकडून ५,००० रुपये तर कपड्यांची खरेदी करणारे ग्राहकांकडून प्रत्येकी २०० रुपये प्रमाणे २,००० हजार रुपये असे एकूण ७,००० रुपये वसूल करून कोविड- १९ चे उल्लंघन केले व दुकान चालू असल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *