भुसावळ (प्रतिनिधि )-
सामाजिक जीवनामध्ये वावरत असताना गप्पा मारुन आनंद घेतला पाहिजे चांगल्या लोकांशी गप्पा मारा यामधून आपल्यावरती अनपेक्षित रित्या चांगले संस्कार जडणघडण होत असते सामाजिक वास्तव आपण ओळखले पाहिजे त्या पद्धतीचा दृष्टिकोन विकसित केला पाहिजे यामुळे आपली भूमिका चांगली होते व आपले आयुष्य देखील आनंदी होत असल्याचे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय मोटिवेशनल स्पीकर महेश मोकलकर यांनी केले

रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली भुसावळ आयोजित द्वंद जीवनाचे या व्याख्यानमालेचे आयोजन आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी व रविवारला केले जाते शिक्षणातून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी या व्याख्यानमालेचे आयोजन केले असून आठवे पुष्प वर्धा येथील आंतरराष्ट्रीय मोटिवेशनल स्पीकर महेश मोकलकर यांनी गुंफले या
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅलीचे प्रेसिडेंट सुधाकर सनांसे यांनी केले तर यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की जीवनातील एखादी पायरी आपली चुकली तर निश्चितपणे पुढील जीवनामध्ये हे अपयश स्वीकारावे लागते यासाठी आयुष्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे म्हणून या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे
यावेळी बोलताना महेश मोकलकर म्हणाले की सामाजिक वास्तव परिस्थिती याकडे आपण कसे बघतो आपला जीवनातला दृष्टिकोन कसा आहे व त्यावरील भूमिका तुमची कशी यावरती आपल्या आयुष्यातला आनंद यश अवलंबून असते यशस्वी होण्यासाठी मला ती गोष्ट मिळवता आली पाहिजे एखाद्याने आपल्याजवळ काही मागितले तर ते देता आले पाहिजे दुसऱ्याच्या कामात आपण मदत केली पाहिजे यशस्वी होणे म्हणजेच समाधान आणि समाधान झाले म्हणजे आयुष्य सुखी होण्याची गुरुकिल्ली विद्यार्थ्यांनी यश मिळवण्यासाठी सेल्फ स्टडी सेल्फ डिसिप्लिन या चांगल्या गोष्टींची शिदोरी जपून ठेवली पाहिजे जडणघडण होत असताना आपल्याला अनेक वेळेला अडचणी येत असतात त्या अडचणींवर मात करण्याची क्षमता आपल्यात निर्माण केली पाहिजे आयुष्यात आपल्याला अनेक लोक भेटतात त्यांच्या पासून चांगल्या गोष्टी स्वीकारण्याची सवय लागली पाहिजे एखाद्या विषयाकडे गंभीरतेने बघता आले पाहिजे आपल्याला मिळालेली गोष्ट विधायक पद्धतीने वापरता आली पाहिजे धावपळीच्या युगात स्वतःला वेळ द्या स्वतःवर प्रेम करा ुसर्या विषयीच्या चांगल्या भावना ठेवा व वेळेचे भान राखा व आपल्या कुटुंबाची जवळीक साधा
कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली चे सेक्रेटरी राम पंजाबी प्रोजेक्ट सेक्रेटरी संजय भटकर प्रोजेक्ट चेअरमन सुनील वानखेडे प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर प्रदीप सोनवणे यांनी परिश्रम घेतले


