विद्यार्थिनींना पॉक्सो कायद्याबाबत मार्गदर्शन; जनता हायस्कूल साक्री येथे कायदेविषयक शिबिर संपन्न!

तालुका विधी सेवा समिती भुसावळचा उपक्रम; बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण आणि कायदेशीर हक्कांबाबत जनजागृती

भुसावळ प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणांतर्गत तालुका विधी सेवा समिती, भुसावळ यांच्या वतीने दि. २९ ऑक्टोबर २०२६ रोजी जनता हायस्कूल, साक्री, ता. भुसावळ, जि. जळगाव येथे विद्यार्थिनींमध्ये कायदेविषयक जागृती निर्माण करण्यासाठी विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक श्री. एस. जी. नेहेते यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक श्री. डी. बी. राजपूत यांनी प्रमुख वक्ते ॲड. अभिजीत मेने व पॅरालीगल व्हॉलेंटियर (पी.एल.व्ही.) जयश्री इंगळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी तालुका विधी सेवा समितीचे पॅनल लॉयर ॲड. अभिजीत मेने यांनी विद्यार्थिनींना लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ (पॉक्सो कायदा) याबाबत सविस्तर माहिती दिली. बालकांचे संरक्षण, लैंगिक गुन्ह्यांचे स्वरूप, कायद्यातील तरतुदी तसेच अशा प्रसंगी उपलब्ध असलेले कायदेशीर संरक्षण याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. यासोबतच तालुका विधी सेवा समितीच्या कार्याची व नागरिकांना मिळणाऱ्या कायदेविषयक सहाय्याची माहितीही दिली.

यानंतर मुख्याध्यापक श्री. डी. बी. राजपूत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पी.एल.व्ही. जयश्री इंगळे व उपशिक्षक श्री. आर. के. पाटील यांनी आभार मानले. उपस्थित विद्यार्थ्यांना राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या विविध योजनांची माहिती देणारी पत्रके वितरित करण्यात आली.

या कार्यक्रमाला पर्यवेक्षक श्री. जी. एस. पवार, उपशिक्षक श्री. आर. एच. चव्हाण, श्रीमती एस. पी. वराडे, श्री. व्ही. पी. नेहेते, श्री. एस. आर. सुपे, श्री. बी. डी. चौधरी, श्री. आर. यू. पाटील, श्री. जी. ई. वानखडे, श्रीमती वाय. जी. फेगडे, श्रीमती के. एस. धांडे, श्रीमती डी. एस. फालक, श्री. एम. ए. नेमाडे, श्री. ए. डी. नेहेते, श्री. एस. बी. हिवरे, लिपिक श्री. निलेश भारंबे व शिपाई श्री. पुष्पक सोनवणे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

विद्यार्थिनींना त्यांच्या हक्कांची आणि कायदेशीर संरक्षणाची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे शिबिर मार्गदर्शक ठरले.