जळगाव (प्रतिनिधी ) -दिवाळीच्या सणानिमित्त समाजातील वंचित, निराधार आणि बेघर ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करण्याच्या उद्देशाने नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था व रेड स्वस्तिक सोसायटी तर्फे संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्र, जळगाव येथे आजी-आजोबांना दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आला. प्रेम, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमामुळे बेघर ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. दिवाळी हा आनंद, प्रेम आणि आपुलकीचा सण असून समाजातील प्रत्येक घटकाला या आनंदात सहभागी करून घेणे हीच खरी दिवाळी असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आले. संस्थेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख, डॉ. अभिजीत पाटील, डॉ. धनंजय बेन्द्रे, डॉ. गणेश पाटील, डॉ. ज्ञानेश्वर पाटील तसेच नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ. मनीषा पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण पाटील यांनी केले, तर प्रा. शिवराज पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. माणुसकी, सेवाभाव आणि सामाजिक संवेदनशीलतेचा संदेश देणारा हा दिवाळी फराळ वाटप उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला या उपक्रमासाठी .मा. आमदार लताताई सोनवणे यांचे विशेष सहकार्य मिळाले. यावेळी वंदना मंडावरे नूतन तासखेडकर किमया पाटील रेणुका हिंगू हर्षा गुजराती तेजल वनरा स्मिता पाटील राधिका शर्मा संचालक श्री प्रशांत गायकवाड व्यवस्थापक मनोज कुलकर्णी किशोर पाटील शितल काटे हर्षल वंजारी खंडू शिरसाट उपस्थित होते


