यावल (प्रतिनिधी)-कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना यावल शहरात समोर आली आहे. आयेशा नगर परिसरातील तिरुपती नगरात ही घटना घडली. हत्येनंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या संशयित पतीला पोलिसांनी साकळी गावाजवळ ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. वर्षभरापूर्वीच झाला होता विवाह पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मशीराबी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात पाठवला. या दाम्पत्याचा विवाह होऊन वर्षही पूर्ण झाले नव्हते. नव्या संसाराचा अशा प्रकारे अंत झाल्याने यावल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


