ऑनलाइन शिक्षण पासून बहुजनांची मुले वंचित?

भुसावळ (प्रतिनिधी )-

सरकार ने शाळा नाही परंतु शिक्षण सुरू अशीघोषणा केली .शहरातील शाळांनीऑनलाइन क्लासेस सुरू केले .शासनाने केवळ ऑनलाइन लेक्चर्स घ्यावीत असंही जाहीर केले परंतु त्यासाठी प्रशिक्षणाची कोणतीहि व्यवस्था केली नाही. ज्या शाळांकडे पुरेशा सुविधा निर्माण नाहीत किंवा प्रशिक्षण देण्याची व्यवस्था नाही त्या शाळांनी ऑनलाईन शिक्षणाची जबाबदारी शिक्षकांवर ठकलली. शिक्षकांनी घरातून अथवा मित्रांकडून झूम ऑप गुगल ऑप ची माहिती करून घेतली . व आप आपल्या परिने ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात केली. या शिक्षणात प्रचंड अडथळे येत आहेत पण शिकविण्याचे समाधान शिक्षकांना मिळत नाही. ग्रामीण भागातील मूले व पालकांकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नाही .ग्रामीण भागात बऱ्याच पालकांची आथिर्क परिस्थिती नसल्याने ते मुले ऑनलाईन क्लास मध्ये सहभागी होत नाहीत.ऑनलाईन शिक्षणात समाविष्ट होणा शेअरिंग केल तर स्क्रीनवर स्क्रबिंग करणे .शिवाय ऑनलाईन शिक्षणासाठि पीपिटी तयार करणे, व्हिडिओ शोधणे व तयार करणे यासाठी शिक्षकांना वेळ द्यावा लागत आहे. ऑनलाईन शिक्षणा ऐवजी प्रत्यक्ष शाळा सुरु व्हायला हव्यात कारण ग्रामीण भागात विजेचे लोडशेडिंगमुळे दिवसा मूलांना दूरदर्शनवर कार्यक्रम पाहता येत नाही .खरचं या उपक्रमातून मूलं शिकत असतील का? असा विचार नेहमी मनामध्ये येत असतो. वाडया ,वस्तया. डोंगर दरयात ,खेड्यात मोबाईल नेटवर्क असते का ? तिथे राहणाऱ्या किती पालकांकडे मोबाईल असतील ?. असलेच तर ते अडॉईड असतील का ? . असलेच तर पोटात चिमटे घेऊन महिना तिनशे किंवा चारशे रूपये ते खर्च करतील का ? .ज्या पालकांकडे साधा मोबाईल आहे त्यांच्या पाल्याचा मनाच्या अपराधी भावविश्वाचा विचार कोण करणार .ज्याच्या घरी मोबाईलच नाही त्यांच्या मूलांनी मोबाइल साठी हटट करावा की मूक आक्रोश ? .अडॉईड मोबाईल हातात देतांना मुलांना विघातक, विध्यसंक किंवा आश्लील आशयापासून कोण वाचणार इत्यादी इत्यादी……।यातून आम्ही या मूलांना घडविणार आहोत की बिघडविणार आहोत याचा विचार बुद्धीवंतानी करावा आणि गोरगरिबांच्या व बहूजनांच्या मुलांना शिक्षणाचा पर्याय शोधावा. श्री.एस.एस.अहिरे , पर्यवेक्षक–नेहरु विद्या मंदिर तळवेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *