शिवसेनेतर्फे भुसावळ तालुक्यात गरीब व गरजूंना दिवाळीचा शिधा वाटप!बोहर्डी, काहूरखेडा, पिंपळगाव, बेलखेडा, किन्ही, सुनसगाव, साकरी, साकेगाव, कंडारीसह विविध गावांत पदाधिकाऱ्यांनी पोहोचवली मदतीची भेट ;

वरणगाव (प्रतिनिधी) : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविण्यात येत असलेल्या दिवाळी शिधा वाटप उपक्रमांतर्गत भुसावळ तालुक्यातील गरीब, गरजू, अपंग, विधवा महिला, लाडक्या बहिणी तसेच शेतकरी बांधवांना दिवाळीचा शिधा वाटप करण्यात येत आहे. आर्थिक अडचणींमुळे कोणाच्याही घरातील दिवाळी अंधारात जाऊ नये आणि प्रत्येक कुटुंबाची दिवाळी गोड व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

दुष्काळाचे सावट आणि आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या कुटुंबांना सणासुदीच्या काळात दिलासा मिळावा, यासाठी राज्यातील २३२ तालुक्यांमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ विधानसभा क्षेत्रात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्हा परिषद गटनिहाय शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र टीम तयार करण्यात आल्या असून, या टीम गावागावांत जाऊन गरजू कुटुंबांना दिवाळीचा शिधा वितरित करीत आहेत.

भुसावळ तालुक्यातील बोहर्डी, काहूरखेडा, पिंपळगाव, बेलखेडा, किन्ही, सुनसगाव, साकरी, साकेगाव आणि कंडारी आदी गावांमध्ये आतापर्यंत शिधा वाटप करण्यात आले आहे. तालुक्यातील उर्वरित गावांमध्येही येत्या दोन ते तीन दिवसांत शिधा वाटप पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिली.

पदाधिकारी व शिवसैनिकांचा सहभाग

या शिधा वाटप उपक्रमावेळी ज्येष्ठ शिवसैनिक विलास मुळे, भुसावळ विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष माळी, तालुकाप्रमुख निलेश ठाकूर, तालुका संघटक सुभाष चौधरी, वरणगाव नगरपरिषद गटनेत्या तृप्ता महाजन, नगरसेवक राजेंद्र चौधरी, विनोद झोपे, माजी सभापती राजेंद्र चौधरी, नारायण कोळी, जितेंद्र नागपुरे, शैलेंद्र ठाकरे, हमीदभाई, महिला जिल्हाप्रमुख नंदा निकम, उपजिल्हाप्रमुख सविता माळी, तालुकाप्रमुख रेखा देशमुख, मनिषा पाटील, वर्षा तलारे, दिशा महाजन, श्रद्धा बेदरकर, अल्पसंख्याक तालुकाप्रमुख पप्पू जकातदार, उपजिल्हा संघटक उल्हास भारसके, उपसरपंच किशोर कोळी, आचेगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य अक्षय बेंडाळे, काहूरखेड्याचे माजी सरपंच विनोद पाटील, बोहर्डीचे सर्वेश पाटील, सागर वंजारी यांच्यासह विविध गावांतील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

सणासुदीच्या काळात गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे.