शिवसेना शहरप्रमुख गणेश चौधरी यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना मदतीचा हात; पदाधिकारी व शिवसैनिकांची उपस्थिती भुसावळ (प्रतिनिधी) : हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त भुसावळ उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत गरजू विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला. जामनेर रोडवरील सोनिच्छा वाडीसमोर शिवसेना शहरप्रमुख गणेश चौधरी यांच्या पुढाकाराने गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि फळांचे वाटप करण्यात आले. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याबरोबरच फळांचे वाटप करण्यात आल्याने लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. या कार्यक्रमाला विधानसभा संपर्कप्रमुख बालाजी पठाडे, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत शर्मा, महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रतिभा जगदाळे, उपशहरप्रमुख नबी पटेल, महिला आघाडी शहरप्रमुख पल्लवी जैन, रेल कामगार सेनेचे ललित मुथा, प्रा. उत्तम सुरवाडे, सहसमन्वयक तथा तालुका संघटक अनिल महाजन, शहर संघटक प्रमुख सुनील गायकवाड, उपशहरप्रमुख राकेश खराडे, कट्टर शिवसैनिक नमा शर्मा, समाजसेवक विलास जाधव, बल्लाळेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष निलेश चौधरी, दीपक सूर्यवंशी, शिवसैनिक विशाल अत्रे, ओम सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कृष्णानगर परिसरातील गोरगरीब व गरजू बालकांसह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक तसेच महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांना हातभार लावण्यासोबतच गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.



