भुसावळ (प्रतिनिधी)- भुसावळ शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती गुरुवार, दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अहमद कुरेशी यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर उपस्थितांनी ‘गांधीजी अमर रहे’ अशा घोषणा दिल्या. कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रविण भाऊ सुरवाडे, अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष मुनव्वर खान, जिल्हा सरचिटणीस रहीम कुरेशी, शहर अध्यक्ष अहमद कुरेशी, अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष ॲड. कैलास शेळके, नगरसेवक बाळा मोरे, इस्माईल पहेलवान, युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव सलमान तडवी, सागर वानखेडे, लिनाताई तल्लारे, रानीताई खरात, विलास खरात, संजय खडसे, अनवर तडवी, शैलेंद्र ननवरे, रुपचंद गौर, सागर कुरेशी, डब्बु कुरेशी, मो. रफिक रनर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा आणि स्वच्छतेच्या विचारांचे स्मरण करून उपस्थितांनी त्यांना अभिवादन केले. कार्यक्रमाची माहिती जिल्हा सरचिटणीस रहीम कुरेशी यांनी दिली.


