पंढरपूर येथे दिनांक १७.११.२०२६ ते दिनांक २३.११.२०२६ या कालावधीत होणाऱ्या कार्तिकी वारीसाठी, भाविकांच्या सोयीकरिता मध्य रेल्वे मिरज - लातूर आणि मिरज - सोलापूर दरम्यान ३६ 'कार्तिकी विशेष' सेवा चालवणार आहे. याचा तपशील खालीलप्रमाणे आहे: *१. मिरज - लातूर अनारक्षित विशेष (१४ सेवा)* गाडी क्रमांक 01405 कार्तिकी विशेष, मिरज येथून दिनांक १७.११.२०२६ ते दिनांक २३.११.२०२६ या कालावधीत सकाळी ०७.०० वाजता सुटेल आणि लातूर येथे त्याच दिवशी दुपारी ०२.३५ वाजता पोहोचेल. (७ सेवा) गाडी क्रमांक 01406 कार्तिकी विशेष, लातूर येथून दिनांक १७.११.२०२६ ते दिनांक २३.११.२०२६ या कालावधीत दुपारी ३.५० वाजता सुटेल आणि मिरज येथे त्याच दिवशी रात्री ११.४५ वाजता पोहोचेल. (७ सेवा) थांबे: अरग, सलगरे, कवठे महांकाळ, ढालगाव, म्हसोबा डोंगरगाव, सांगोला, पंढरपूर, मोडलिंब, कुर्डुवाडी, शेंद्री, बार्शी टाऊन, पांगरी, धाराशिव, येडशी, कळंब रोड, ढोकी, मुरुड, औसा रोड आणि हरंगुळ. *२. मिरज - लातूर अनारक्षित विशेष गाड्या (८ सेवा)* गाडी क्रमांक 01407 कार्तिकी विशेष, मिरज येथून दिनांक १९.११.२०२६ ते दिनांक २२.११.२०२६ या कालावधीत रात्री १०.०० वाजता सुटेल आणि लातूर येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ०५.३० वाजता पोहोचेल. (४ सेवा) गाडी क्रमांक 01408 कार्तिकी विशेष, लातूर येथून दिनांक १९.११.२०२६ ते दिनांक २२.११.२०२६ या कालावधीत सकाळी ०६.०० वाजता सुटेल आणि मिरज येथे त्याच दिवशी दुपारी १.५० वाजता पोहोचेल. (४ सेवा) थांबे: अरग, सलगरे, कवठे महांकाळ, ढालगाव, जत रोड, म्हसोबा डोंगरगाव, सांगोला, पंढरपूर, मोडलिंब, कुर्डुवाडी, शेंद्री, बार्शी टाऊन, पांगरी, धाराशिव, येडशी, कळंब रोड, ढोकी, मुरुड, औसा रोड आणि हरंगुळ. *३. सोलापूर – मिरज अनारक्षित विशेष गाड्या (१४ सेवा)* गाडी क्रमांक 01419 कार्तिकी विशेष, सोलापूर येथून दिनांक १७.११.२०२६ ते दिनांक २३.११.२०२६ या कालावधीत सकाळी ०७.०० वाजता सुटेल आणि मिरज येथे त्याच दिवशी दुपारी १२.२० वाजता पोहोचेल. (७ सेवा) गाडी क्रमांक 01420 कार्तिकी विशेष, मिरज येथून दिनांक १७.११.२०२६ ते दिनांक २३.११.२०२६ या कालावधीत दुपारी १.०० वाजता सुटेल आणि सोलापूर येथे त्याच दिवशी सायंकाळी ७.१० वाजता पोहोचेल. (७ सेवा) थांबे: मोहोळ, माढा, कुर्डुवाडी, मोडलिंब, पंढरपूर, सांगोला, म्हसोबा डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, कवठे महांकाळ, सलगरे आणि अरग. वरील सर्व गाड्यांची संरचना: १६ सामान्य द्वितीय श्रेणी / विना-वातानुकूलित चेअर कार आणि २ सामान्य द्वितीय श्रेणी सह गार्ड्स ब्रेक व्हॅन. अनारक्षित डब्यांसाठीची तिकिटे 'यूटीएस' प्रणालीद्वारे बुक करता येतील. यासाठी सुपरफास्ट मेल/एक्सप्रेस गाड्यांच्या नियमांनुसार लागू असलेले सामान्य दर आकारले जातील. प्रवासी तिकीट बुक करण्यासाठी 'रेलवन' ॲप देखील डाउनलोड करू शकतात. या विशेष गाड्यांच्या थांब्यांवरील सविस्तर वेळापत्रकासाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.



