बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त भुसावळात अभिवादन व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम ;शिवसेना उबाठा महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख प्रतिभाताई जगदाळे यांच्या उपस्थितीत आयोजन;

भुसावळ (प्रतिनिधी) - हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने भुसावळ येथे विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासह विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप यासह विविध समाजपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम मंगळवार, दिनांक १७ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता जामनेर रोडवरील कृष्णा नगर, भुसावळ येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला शिवसेना उबाठा महिला आघाडीच्या रावेर लोकसभा जिल्हाप्रमुख प्रतिभाताई जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात हिंदुत्व, मराठी अस्मिता, सर्वसामान्यांचे प्रश्न आणि समाजहितासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण या दिवशी करण्यात येणार आहे. त्यांच्या विचारांना अभिवादन करत सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा मुलांना खाऊ, फळवाटप आदी उपक्रम राबविण्यात येत आहे.

या कार्यक्रमासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व निष्ठावंत शिवसैनिक, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसेना महिला आघाडी तसेच युवासेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने आणि वेळेवर उपस्थित राहावे तसेच शिवप्रेमी व बाळासाहेब प्रेमीनी उपस्थित राहावे, असे आवाहन भुसावळ शहरप्रमुख गणेश चौधरी (सोनवणे) आणि शिवसेना सोशल मीडियाचे तुषार बऱ्हाटे यांनी केले आहे.