सुनसगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचा शताब्दी महोत्सव उत्साहात साजरा! सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकरी आणि सभासदांची सेवा करण्याची संधी मिळाली – रजनीताई सावकारे

    भुसावळ (प्रतिनिधी ) : तालुक्यातील सुनसगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचा शताब्दी महोत्सव सोहळा १४ नोव्हेंबर रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या नवनिर्वाचित जिल्हा बँकेच्या बिनविरोध संचालिका रजनीताई सावकारे यांनी, “सुनसगाव विकासोच्या शताब्दी महोत्सव सोहळ्यात सहभागी होण्याचे आणि हा ऐतिहासिक क्षण अनुभवण्याचे भाग्य माझ्या नशिबी आले, याचा मला मनस्वी आनंद आहे,” असे प्रतिपादन केले.
सुनसगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची स्थापना १२ नोव्हेंबर १९२६ रोजी झाली होती. या संस्थेच्या शंभर वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचे औचित्य साधून १४ नोव्हेंबर २०२६ रोजी शताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे, याच दिवशी परिसरात भूकंपाची घटना घडल्याने प्रमुख पाहुण्या खासदार रक्षा खडसे आणि राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजयभाऊ सावकारे यांना आपला नियोजित दौरा बदलावा लागला. मात्र, जिल्हा बँकेच्या नवनिर्वाचित संचालिका रजनीताई सावकारे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
यावेळी हरी पांडू पाटील, क्षेत्रीय अधिकारी पी. एस. सोनवणे, बाजार समितीचे चेअरमन अनिल वारके, सदस्य सुरेखा पाटील यांच्यासह प्रमुख पाहुण्या रजनीताई सावकारे व निलेश वाणी यांचा सत्कार करण्यात आला.
    याप्रसंगी बोलताना रजनीताई सावकारे म्हणाल्या की, भुसावळ तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून जिल्हा बँकेच्या संचालकपदासाठी बिनविरोध निवड होणे ही आनंदाची बाब आहे. या भागातील सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकरी आणि सभासदांची सेवा करण्याची संधी सुद्धा मिळाली असून, सोसायट्यांच्या माध्यमातून जी जबाबदारी माझ्यावर येईल ती प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. सुनसगाव विकासोच्या शताब्दी महोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे. सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ देणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शताब्दी महोत्सवाचे प्रास्ताविक पॅनल प्रमुख भालचंद्र पाटील व चेअरमन सुजित पाटील यांनी केले. यावेळी शेतकरी पुंडलिक कंखरे आणि महेश भोळे यांनी शेतीच्या कंपाऊंड वॉलसाठी अनुदान उपलब्ध करून देण्याची मागणी रजनीताई सावकारे यांच्याकडे केली.
या शताब्दी महोत्सव सोहळ्याचे सूत्रसंचालन ह.भ.प. रमेश महाराज पाटील यांनी केले, तर विकासोचे सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र काटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी व्हाईस चेअरमन महेश भंगाळे, संचालक मंडळाचे माजी चेअरमन सुदाम भोळे, युवराज पाटील, भास्कर पाटील, दिनकर भोळे, महेश भोळे, वासुदेव पाटील, सतीश पाटील, जितेंद्र काटे, माधव सपकाळे, सुरेखा पाटील, मालतीबाई जंगले, नरेंद्र नारखेडे, गोविंदा नारखेडे, संस्थेचे सचिव योगेश पाटील, कारकून हर्षल पाटील, शिपाई जितेंद्र पाटील तसेच संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शताब्दी महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजयभाऊ सावकारे यांच्या माध्यमातून सर्व सभासद बंधू-भगिनींसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. शंभर वर्षांची परंपरा जपत शेतकरी आणि सहकार क्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.