जळगाव (प्रतिनिधी )-अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे लचके तोडणाऱ्या व या प्रवर्गातील सर्व ५९ जातींच्या प्रगतीचा मार्ग रोखण्या करिता केल्याजात असलेल्या उपावर्गिकरणाचा डाव हाणून पाडण्या करिता महाराष्ट्रात जागोजागी निषेध मोर्चे निघत आहेत . जळगाव येथे रविवार दिनांक ४ ऑक्टोंबर रोजी भव्य मोर्चा दुपारी २ वाजता आयोजित केला आहे हा मोर्चा यशस्वी करण्या करीत या मोर्चात सर्व ५९ जातीतील जनतेने हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले.
मोर्चाच्या प्रचारार्थ अजिंठा हाउसिंग सोसायटी, जळगाव येथे आयोजित प्रचार सभेत मार्गदर्शन करताना वाघ बोलत होते.
जयसिंग वाघ यांनी आपल्या भाषणात पुढं सांगितले की, आरक्षण हे जातीवर आधारित नसून जात समूहावर आधारित आहे . हजारो वर्षांपासून सामाजिक , धार्मिक दृष्ट्या ज्या जातींना अस्पृश्य समजण्यात आले आहे अश्या जातींना संविधान सभेने अनुसूचित जाती म्हणून संबोधले व त्यांना त्यांच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात आले आहे तेंव्हा त्याचे तुकडे करणे म्हणजे संविधानाच्या मुळ उद्येशाला नाकारणे होय . सर्वोच्य न्यायालयाने संविधानाच्या मुळ उद्येशाला बगल देत जातीला प्राधान्य देऊन त्यांच्या प्रगतीचा मार्ग संकुचित केला आहे असेही त्यांनी सांगितले .
ॲड. आनंद कोचुरे यांनी मोर्चा यशस्वी करण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे सांगितले .
चेअरमन दिलिप सपकाळे यांनी सुरवातीस भगवान बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन केले . मोर्च्याची भूमिका विषद केली .
प्रास्ताविक अशोक सैंदाणे , सूत्रसंचालन ज्योती भालेराव, परिचय पी. डी. सोनवणे, स्वागत अरुण सोनवणे आभारप्रदर्शन कविता सपकाळे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय भालेराव , प्रमोद मेढे, सुनील बिऱ्हाडे , राजेंद्र सपकाळे , वर्षा कोचुरे , पूजा कोचुरे , लक्ष्मी भालेराव यांनी परिश्रम घेतले .
कार्यक्रमास विमल भालेराव , कमल सोनवणे , नूतन तासखेडकर, प्रतिभा सपकाळे , सरला भालेराव , लता बिऱ्हाडे, ममता सपकाळे , शुभांगी सपकाळे आदींसह स्त्री - पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेनंतर विविध प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या व मोर्चाचे पत्रकं घरोघरी वाटण्यात आले .