भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळच्या राजकीय वर्तुळात सध्या दोन लाख रुपयांच्या पैजेची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. वस्त्रोद्योग मंत्री संजय वामन सावकारे यांचे मंत्रिपद जाणार की कायम राहणार, या मुद्द्यावरून नगरसेवक पिंटू ठाकूर यांनी माजी नगराध्यक्ष अनिल छबिलदास चौधरी यांना थेट खुले आव्हान दिले आहे. या आव्हानानुसार, येत्या दोन महिन्यांच्या कालावधीत मंत्री संजय सावकारे यांचे मंत्रिपद गेल्यास नगरसेवक पिंटू ठाकूर हे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांना दोन लाख रुपये देणार आहेत. मात्र, या कालावधीत मंत्री सावकारे यांचे मंत्रिपद कायम राहिल्यास अनिल चौधरी यांनी पिंटू ठाकूर यांना ५० हजार रुपये द्यायचे, अशी ही पैजेची अट असल्याचे सांगण्यात येत आहे. या अनोख्या पैजेने भुसावळच्या राजकीय चर्चांना नवा विषय मिळाला आहे. मंत्री संजय सावकारे यांच्या मंत्रिपदाबाबत सुरू असलेल्या दाव्या-प्रतिदाव्यांना आता थेट आर्थिक पैजेचे स्वरूप आले आहे. पिंटू ठाकूर यांनी चौधरी यांना दिलेल्या या आव्हानाची शहरातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.



