. महिला क्रीडा मंडळातर्फे राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेला दिमाखात सुरुवात; सावकारे दाम्पत्याने पटावर डाव मांडत केले उद्घाटन भुसावळ ( प्रतिनिधी ).महिला क्रीडा मंडळ, भुसावळ यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचा आज ९ऑगस्ट रोजी रामानंद सभागृहात उत्साहात शुभारंभ झाला. यावेळी वस्त्रोद्योग राज्यमंत्री संजय सावकारे त्यांच्या अर्धांगिनी प्रतिष्ठा महिला मंडळ अध्यक्षा सौ रजनी सावकारे यांनी स्वतः बुद्धिबळाचा डाव खेळत स्पर्धेचे उद्घाटन केले. या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध भागांतून सुमारे २५० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे. त्यामुळे रामानंद सभागृहात बुद्धिबळपटूंची मोठी गर्दी पाहायला मिळत असून, विविध गटांमध्ये सामने रंगत आहेत. स्पर्धेच्या माध्यमातून बुद्धिबळ खेळाला प्रोत्साहन देण्यासोबतच नवोदित खेळाडूंना राज्यस्तरावर आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळत आहे. स्पर्धेला खेळाडू, पालक आणि क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रामानंद सभागृहात सुरू असलेल्या या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेकडे भुसावळकरांचे लक्ष लागले आहे.स्पर्धा यशस्वीतेसाठी महिला क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा सौ आरती चौधरी व मंडळ सदस्या परिश्रम घेत आहे.


