जागतिक आदिवासी दिनानिमित्त भुसावळात भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन :

भुसावळ (प्रतिनिधी ) : ९ ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त भुसावळ शहरात शूरवीर क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यात येणार आहे.
रविवार, दि. ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता दीनदयाल नगर, भुसावळ येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास सर्व भाजपा कार्यकर्ते, भाजपा प्रेमी, हिंदू बांधव तसेच आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन करावे, असे आवाहन नगरसेवक महेंद्रसिंग ऊर्फ पिंटू ठाकूर यांनी केले आहे.