१५ वर्षा खालील बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात : वेदांत पाटील विजेता :


भुसावळ (प्रतिनिधी ) – जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेने , बेस्ट मुव्ह चेस क्लब आयोजित१५वर्षा खालील बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात पार पडली.या स्पर्धेमध्ये २३खेळाडूंनी (५आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त)सहभाग नोंदवला. या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परेश देशपांडे, जयेश वेद, महेश चौधरी, सोमवंशी सर,अजय बांगड, भारत आमले , धनंजय पिंपळे , यांनी परिश्रम घेतले. रामनिवास झंवर साहेब यांनी सर्व खेळाडू व पालकांसाठी स्नॅक्स उपलब्ध करुन दिले.
स्पर्धेचे बक्षीस वितरण रामनिवास झंवर साहेब, जयेश वेद, धनंजय पिंपळे यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेचा निकाल –
खुला गट १) वेदांत पाटील २) आदित्य झंवर ३) अभंग सोनवणे ४)गौरव बोरसे५ ) अंगद मंगलानी६) नक्ष झंवर ७) चिन्मय पिंपळे
९ वर्षा खालील गट १) अद्विक मित्तल २) शुभायु शिरोडे
विशेष उत्तेजनार्थ सर्वात लहान खेळाडू १)देव वेद.
या प्रसंगी आयोजकांनी अशा स्पर्धा नेहमी वेगवेगळ्या प्रकारे घेतल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले.