भुसावळ –
ठाणे येथील युवासेना पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करा अशी मागणी भुसावळ शिवसेनेतर्फे करण्यात आली असून प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे .
,
काल ठाण्यामध्ये शिंदे गटाच्या प्रवक्त्याने रणजित इंगळे या पत्रकाराला धमकी दिली होती त्याबद्दल युवा सेनेच्या रोशनी शिंदे यांनी पोस्ट टाकली होती की दिघे साहेब असते तर त्यांनी अशा वेळी काय केले असते हे सर्वांना माहीत आहे नुसतं आनंद मठ नावावरून काही होत नसत अशा पोस्ट चा राग आल्याने शिंदे गटाच्या महिलांनी रोशनी शिंदे यांना बेदम मारहाण केली व रोशनी शिंदे यांची पोलिसांनी फिर्याद देखील घेतलेली नाही उलट रोशनी शिंदे वरच गुन्हा दाखल केला याचा आम्ही तीव्र निषेध करतो व रोशनी शिंदेवर हल्ला करणाऱ्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करावे अन्यथा लोकशाही मार्गाने आपल्या कार्यालयसमोर आंदोलने करण्यात येइल
यावेळी शहर प्रमुख दिपक धांडे,हेमंत खंबईत,निलेश महाजन,कैलाश लोखंडे,बबलू बारहाते,योगेश बागुल,स्वप्नील सावळे,राकेश खरारे,सोनी ठाकूर,पिंटू भोई,शरद जैस्वाल,शरद जोहरे,गोकुळ बाविस्कर,राजू इंगळे,रिंकू भोई व शिवसैनिक उपस्थित होते



