भुसावळ – इनरव्हील क्लब ऑफ जळगांव तर्फे स्लम एरियात लहान मुलांसाठी नुकताच दि.१९ मार्च २३ रोजी एज्युकेशन प्रोग्राम सहित संस्कार वर्गही घेण्यात आले.

क्लबच्या सदस्या निशीता रंगवानी या गेल्या वर्षभरापासून दर रविवारी हे वर्ग चालवत आहेत. या वर्गात एकून 98 मुलांनी हनुमान चालिसा, श्लोक, शारीरिक स्वास्थ्य, स्वच्छता, योगासने, ब्रेन ऍक्टिव्हिटी यासोबतच आपल्या सणांचे महत्वही वेळोवेळी शिकले.यावेळी झालेल्या एज्युकेशन प्रोग्राम मध्ये पुस्तके व काही आरोग्यपूर्ण खाद्यपदार्थानचेही वाटप करण्यात आले अशी माहिती क्लब च्या प्रेसिडेंट डॉ. रितू कोगटा यांनी दिली.या वेळी उपस्थित संध्या महाजन, गुंजन कांकरिया याचेही अनमोल सहकार्य लाभले .


