वरणगाव येथे कोरोना बाधीत रुग्णासाठी कोविड केअर सेंटर व अक्सिजन बेडची सुविधा त्वरित उपलब्ध करावी – भुसावळ तालुका शिवसेनेतर्फे मागणी ; जिल्हा शल्यचिकित्सकांकडे निवेदन सादर ;


भुसावळ (प्रतिनिधि )-
भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरात सुसज्ज असे ग्रामीण रुग्णालय आहे वरणगाव शहराला लागून ग्रामीण भागत असल्याने व खुद्द वरणगाव शहरातील लोकसंख्या पन्नास हजाराच्या जवळपास असल्याने वरणगाव शहरा त्वरित ग्रामीण रुग्णालयात कोविड-१९ च्या रुग्णावर उपचार करण्यासाठी सेंटर सुरू करण्यात यावे , जेणेकरून रुग्णांना भुसावळ जळगाव येथे जाण्याचा ताण वाचेल येथील रुग्ण भुसावळ जळगाव येथे जाऊनही त्यांना आवश्यक त्या सुविधा मिळत नाहीत वरणगाव शहर व आजूबाजूच्या ग्रामीण भागाचा विचार करता वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात त्वरित कोविंड सेंटर सुरू करावे व येथील स्थानिक व परिसरातील लोकांना दिलासा द्यावा त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत आम्ही शिवसेनेच्या वतीने आपणास करण्यास तयार आहोत तसेच येथील शेजारील प्राथमिक आरोग्य केंद्र कठोरा व प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळगाव येथील स्टॉप वरणगाव येथील स्टॉप यांचे नियोजनबद्ध नेमणुका करून त्वरित कोविड-१९ रुग्णांसाठी उपचार केंद्र सुरू करावे व परिसरातील जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी शिवसेनेच्या वतीने ई-मेल द्वारे निवेदन पाठवून करण्यात आली . जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे करण्यात आली असून निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी भुसावळ तहसीलदार भुसावळ यांना देण्यात आल्या असून वरणगाव ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य अधिकारी यांना देखील आज निवेदन देण्यात आले .
प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन जिल्हा संघटक विलास मुळे , अल्पसंख्यांकांचे उपजिल्हा संघटन सईद मुल्लाजी , उपशहर प्रमुख प्रशांत पाटील ,राजेन्द्र परसे राहुल बावणे निलेश सुरडकर निलेश कळसकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *