भुसावळ (प्रतिनिधी )-
वरणगाव नगर परिषदेत माजी नगराध्यक्ष व माजी नगरसेवक गावातील काही विशिष्ट लोक नगरपरिषदेच्या कामकाजात हस्तक्षेप करताना दिसत आहेत नगरपालिकेची आलेली कामे परस्पर निविदा मॅनेज करून देणे नगरपरिषदेच्या कामावर अनधिकृतपणे लक्ष ठेवणे नगरपरिषदेच्या विविध इमारती आपल्या हस्तका मार्फत आपल्या ताब्यात ठेवणे व त्याचा उपभोग घेणे तिथल्या वस्तू परस्पर लांबवणे नगर परिषद द्वारा निर्मित बगीच्यांचे ताबा आपल्याकडे ठेवून त्यावर नियंत्रण ठेवणे संबंधित ठेकेदारांना बगीच्यांचे काम दिलेल्या असून त्यांचे पाच वर्षाच्या मेंटेनन्स संबंधितांकडे आहे म्हणजे संबंधित ठेकेदाराकडे आहे तसे न होता त्याकडे दुसरेच लोक चाबी स्वतःकडे ठेवून घेऊन खाजगी बगीच्या म्हणून त्याचा उपभोग करीत आहे तसेच गावातील शासकीय कामांचे उद्घाटन देखील कोणतीही शासकीय परवानगी न घेता नगरपरिषदेतील प्रशासक नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किंवा इतर प्रशासकीय कर्मचारी यांना काहीही न कळवता डायरेक्ट उद्घाटनही करून स्वतःच्या नावाचा तुरा मिळवण्यासाठी शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रकार आहे तरी संबंधितांविरुद्ध त्वरित कारवाई करून यापुढे असे होणार नाही याची दक्षता घ्यावी असे संबंधित नगर परिषद प्रशासनाला कळवावे निवेदनाची एक प्रत नगर परिषद वरणगाव प्रशासनाला देण्यात आली असून त्यांनी याबाबत त्वरित कार्यवाही करावी असेही त्यांना सुचवण्यात आले आहे . निवेदनावर शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन उपजिल्हा संघटक विलास मुळे अल्पसंख्यांक उपजिल्हा संघटन सईद मुल्लाजी , उपशहर प्रमुख प्रशांत पाटील , निलेश सुरडकर , राजेंद्र परसे, यांच्यासह शिवसैनिकांचा सह्या आहे .



