साई निर्मल फाउंडेशन तर्फे वाफ सप्ताहात सहभागी व्हावे – शिशिर जावळे याचे आवाहन ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाचा भयंकर प्रादुर्भाव संपूर्ण जगाला बघायला मिळत आहे. भारतातही कोरोना दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे त्यामुळे आता जगात कोरोना पासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या प्रकारचे उपाय सुचवले जात आहेत. त्यातील सर्वात एक उत्तम उपाय म्हणजे म्हणजेच विशिष्ट मर्यादेत सकाळ-संध्याकाळ पाच पाच मिनिट वाफ घेणे आणि गरम पाणी पिणे . वाफ घेतल्याने आणि गरम पाणी पिल्याने कोरोना बरा होतो असं अनेक अनेक तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. कोरोना चे प्रमुख लक्षण म्हणजे ताप सर्दी खोकला आणि न्यूमोनिया. दरम्यान डॉक्टर सर्दी किंवा कफ झाला की वाफ आणि गरम पाणी घेण्याचा सल्ला देतात. कारण वाफ घेतल्यामुळे आपल्या नाकातील आणि गळ्यातला म्युक्स ज्यामुळे कप तयार होतो पातळ होतो. तसेच आपल्या शरीरात कमी झालेला यांचे प्रमाण वाढतं. त्यामुळे आपल्याला मोकळा श्वास घेता येतो.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार म्हणण्यानुसार covid-19 च्या विषाणूला नाक आणि तोंडाद्वारे गरम पाणी आणि वाफ सकाळ-संध्याकाळ पाच पाच मिनिट घेतल्यास covid-19 च्या विषाणू ला मारला जाऊ शकत. जर पूर्ण भुसावळ सहजळगाव जिल्ह्यामध्ये आणि देशांमध्ये, शहरांमध्ये,खेड्यांमध्ये, मोहल्ले, वस्त्यांमध्ये नागरिकांनी आपल्या कुटुंबासह एक साथ, एक सप्ताह दररोज सकाळी आणि रात्री झोपताना पाच पाच मिनिट वाफ आणि गरम पाणी पिल्यास नक्कीच आपण कोरोना विषाणूच्या संक्रमणापासून वाचू शकतो आणि त्या विषाणूचा नक्कीच नायनाट करू शकतो. म्हणून समस्त नागरिकांनि दिनांक 1मे 2021 ते 7 मे 2021 या दरम्यान साई निर्मल फाउंडेशन आयोजित वाफ सप्ताहात कुटुंबीयांसह दररोज सकाळ संध्याकाळ पाच पाच मिनिट वाफ आणि गरम पाणी पिऊन कोरोना विषाणूचा समूळ नायनाट करण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन साई निर्मल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिशिर दिनकर जावळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केलेले आहे. जे नागरिक कुटुंबिय याबाबत सप्ताहामध्ये सहभागी होऊ इच्छित असतील अशांनी चंद्रशेखर पाटील प्रकल्प प्रमुख:-9766766888, सहाय्यक प्रकल्प प्रमुख नरेंद्र बऱ्हाटे 9823246699, एडवोकेट सागर सरोदे 9284228062.
पुष्पाताई सरोदे पाटिल :-8329893303
या क्रमांकांवर NAME space CITY space YES I INVOLVED असा text मेसेज वरील क्रमांकांवर पाठवावे किंवा वरील क्रमांकांवर व्हाट्सअप च्या माध्यमातून कळवावे. असे आवाहनही संस्थेतर्फे करण्यात आलेले आहे. होऊन सहभागी वाफ सप्ताहात…., कोरोना मुक्त करू भारतास जगतात!!! हे या अभियानाच,ब्रीद असल्याचं
जावळे यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *