भुसावळ (प्रतिनिधी )-
महामानव डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या१३० व्या जयंती निमित्त तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमिवर येथील सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्था ,गोपाल युवा बिग्रेड रक्तदाते , व डॉ.बी.आर.आंबेडकर फाऊंडेशन यांच्यावतीने
रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर रक्तदान शिबिर स्थानिक नेत्रम आय हॉस्पिटल ब्राम्हण संघा जवळ,भुसावळ येथे सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे . तरी रक्तदान करणाऱ्या दात्यांनी रक्तदान करण्यासाठी
सौ.राजश्री नेवे ९८९००२१८८९
निलेश फंड ८६०५०६०५४७ व राहुल पांडव ९५७९३२१८१० यांचेकडे संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
यावेळी शासनाच्या त्रिसूत्री नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे .



