भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील मुख्य बाजारपेठेतील मरीमाता मंदिमाता चौकात मंगळवारी दुपारी तेरापंथ शीतलजल प्याँऊचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सचे पालन करून करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून पाणपोई असली तरी तिची काहीशी दुरवस्था झाल्याने नगरसेवक पिंटू कोठारी यांनी दखल घेत पाणपोईची डागडूजी केली तसेच अत्याधूनिक आर.ओ.प्लाँटची सुविधा उपलब्ध करून दिल्याने या परीसरातील नागरीक तसेच वाटसरूंची भर उन्हाळ्यात थंड पाण्यामुळे तृष्णा भागणार आहे. दिवसभरात साधरण सकाळी नऊ ते सायंकाळी सहा दरम्यन साधारण पाच हजार नागरीकांना पिण्याच पाणी पुरवण्याची या पाणपोईची क्षमता आहे. मंगळवारी दुपारी 12 वाजता स्व.मोतीलालजी लखीचंद निमाणी व स्व.सुजीत रमेशचंद्र कोठारी यांच्या स्मरणार्थ तेरापंथ शीतलजल प्याँऊचे उद्घाटन रमेशचंद्र पूनमचंद कोठारी व कांचनबाई मोतीलाल निर्माणी यांच्याहस्ते करण्या आले.
भुसावळातील जैन श्वेतांबर सभा संचलित तेरापंथ शीतलजल प्याँऊचा जीर्णोद्धार करण्यात आल्यानंतर ती मंगळवारपासून खुली करण्यात आली आहे. 1987 साली ही पाणपाई सुरू करण्यात आली होती मात्र दरम्यानच्या मध्यंतरीच्या काळात तीची दुरवस्था झाल्यानंतर नगरसेवक पिंटू कोठारी यांनी दखल घेत तिची दुरवस्था थांबवली.
याप्रसंगी नगरसेवक नगरसेवक (पिंटू) कोठारी व कविता कोठारी, अजीत कोठारी, मंजू कोठारी व मरीमाता चौकातील व्यावसायीक तसेच लोटगाडीधारक उपस्थित होते.



