वरणगांव – भुसावळ राष्ट्रीय मार्गावर भिषण अपघात, दोघांचा मृत्यू ;

वारंवार होणाऱ्या अपघातांची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी - वर्षाताई तल्लारे 
भुसावळ (प्रतिनिधी)-

राष्ट्रीय महामार्गावरील भुसावळ ते वरणगाव मार्गावर असलेल्या सोसायटी वाईनजवळ मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास दुर्दैवी कंटेनर व दुचाकीमध्ये भिषण अपघात झाला. या अपघातात आग्रा येथील एका परप्रांतीय युवकाचा जागीच तर भुसावळ येथील एका जेष्ठ नागरिकाचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यु झाला . दरम्यान अनेकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्गावरील सोसायटी वाईन शॉप जवळ वरणगावकडून भुसावळकडे जाणाऱ्या एका मोपेड गाडीला मागुन भरवेगात येणाऱ्या कंटेनरने जबर धडक दिली यामध्ये दुचाकीवरील दोन्ही जण लांब फेकले गेले तर दुचाकी काही अंतरापर्यंत फरफटत गेली . या अपघातात भुसावळातील देवेंद्र चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला तर मिर्झा सलीम बेग गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना भुसावळच्या ट्रामा केअर सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले . मात्र, उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यु झाला . अपघाताचे चित्र पाहताच अनेकांनी पळून जाणाऱ्या कंटेनरचा पाठलाग करीत कंटेनर चालकाला नशिराबाद टोल नाक्यावर पकडून पोलीसांच्या स्वाधीन केले . यावेळी समाजसेवक बाळाभाऊ पवार, संगीतभाऊ खरे, साय्मी सोनवणे तसेच परिसरातील असंख्य नागरिक घटनास्थळी उपस्थित झाले. प्रसंगी राष्ट्रीय महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांबाबत यापूर्वीही प्रशासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आला आहे. तरी देखील या मार्गावर दिवसाला दोन-तीन अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब आहे. त्यामुळे प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन राष्ट्रीय महामार्गावरील अपघात प्रवण ठिकाणांची पाहणी करावी, आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना कराव्यात आणि भविष्यात निष्पाप नागरिकांचे जीव जाणार नाहीत यासाठी ठोस कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी वर्षाताई तलारे भुसावळ तालुकाप्रमुख, शिवसेना (शिंदे गट)
पोलीस हक्क संघर्ष संघटना, महाराष्ट्र राज्य
जळगाव जिल्हाप्रमुख यांनी केली आहे .