भुसावळात सोन पाऊलांनी आलेल्या श्री महालक्ष्मीचा उत्साहात सोहळा संपन्न ; श्रद्धा, परंपरा आणि महिला सहभागाने तीन दिवसीय गौरी उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी) : येथील विठ्ठल मंदिर वॉर्डातील पत्रकार उज्वला बागुल यांच्या निवासस्थानी श्री ज्येष्ठा गौरी अर्थात श्री महालक्ष्मीची सोन पाऊलांनी आलेल्या गौरीची भक्तिमय वातावरणात स्थापना करण्यात आली. तीन दिवसीय गौरी उत्सव मोठ्या भक्तिभावाने, पारंपरिक पद्धतीने आणि विधिवत पूजा-अर्चनेने उत्साहात संपन्न झाला.

सोन पाऊलांनी आगमन झालेल्या श्री महालक्ष्मीची पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा करण्यात आली. विविध रंगीबेरंगी फुलांची आकर्षक आरास, धूप-दीप, आरती तसेच पारंपरिक नैवेद्यामुळे संपूर्ण घरातील वातावरण भक्तिमय झाले होते. या सोहळ्यानिमित्त महिलांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

महालक्ष्मी भोजनासाठी विविध पारंपरिक भाज्या, पुरण, वरण, भात , अनारसे, करंजी, मोदक, लाडू यांसह विविध खाद्यपदार्थांचा नैवेद्य दाखविण्यात आला. तसेच महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित महिलांनी एकमेकींना सौभाग्याचे वाण देत गौरी उत्सवाचा आनंद द्विगुणित केला.




या प्रसंगी वस्त्रोद्योग राज्यमंत्री ना. संजय सावकारे यांच्या सुविद्य पत्नी तथा प्रतिष्ठा मंडळाच्या अध्यक्षा सौ. रजनी सावकारे, नगरसेविका सौ. मेघा वाणी, देवा भाऊ वाणी, नगरसेवक बबलू बऱ्हाटे, डॉ. सुवर्णा गाडेकर, सुनीता जोशी, पारूल वर्मा, सुनंदा डांगे,ॲड जयश्री देशमुख, डॉ. वृषाली चौधरी, ॲड. सुचिता भैसवाल, शितल,  चारू महाजन, यांच्यासह सक्षम महिला फाउंडेशनच्या सदस्या तसेच विविध क्षेत्रातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उपस्थित भाविक महिलांनी श्री महालक्ष्मीचे दर्शन घेतले तसेच महाप्रसाद व भंडाऱ्याचा लाभ घेतला.

श्रद्धा, भक्ती, पारंपरिक संस्कृती आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हा गौरी उत्सव अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.