भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्याच्या नियोजनासाठी सार्वजनिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची स्थापना करण्यात आली. यासाठी त्रिरत्न बुद्ध विहार येथे एन. टी. इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. बैठकीला प्रमुख उपस्थिती म्हणून प्रकाश सरदार, सी. एम. यावलकर, रमेश सिरसाठ, रमेश खंडारे, दीपक सुरवाडे, मनीष सुरवाडे, अरुण भालेराव उपस्थित होते. तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या शाखाध्यक्षा उषाताई सुरवाडे, सरचिटणीस प्रज्ञा खंडारे, केंद्रीय शिक्षिका करुणा नरवाडे, चंदा खंडारे, वैशाली जाधव, प्रज्ञा मेश्राम, रत्ना नाईक यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी १४ एप्रिल २०२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार उत्सवाच्या नियोजनासाठी पुढीलप्रमाणे कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. निवड झालेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : - अध्यक्ष : सुमेध कांबळे - कार्याध्यक्ष : आशिष सुरवाडे - उपाध्यक्ष : कुणाल इंगळे - सचिव : सूरज पवार - कोषाध्यक्ष : दिनेश साळवे - सहकोषाध्यक्ष : प्रणव मेश्राम - प्रसिद्धी प्रमुख : रमेश खंडारे - संघटक : अविनाश जाधव सल्लागार : एन. टी. इंगळे, रमेश सिरसाठ, सी. एम. यावलकर, करुणा नरवाडे, उषा सुरवाडे, चंदा खंडारे. सदस्य : गौरव नरवडे, मनीष सुरवाडे, विशाल जोहरे, अरुण भालेराव, उल्हास मोरे, सौरव सरदार, सागर नाईक, निखिल मेश्राम, तरुण गवई, विद्यानंद मेश्राम. बैठकीचे सूत्रसंचालन प्रकाश सरदार यांनी केले. नवनियुक्त कार्यकारिणीच्या माध्यमातून जयंती उत्सवाचे नियोजन करण्यात येणार असून, यासाठी गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग राहणार आहे.



