भडगाव येथे भुसावळच्या गौरक्षकांचा सन्मान ; रिद्धी सिद्धी बहुउद्देशीय गणेश मित्र मंडळातर्फे सन्मानपत्र व सन्मानचिन्ह प्रदान ;

भडगाव,(प्रतिनिधी ) - सनातन हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, परंपरा व धार्मिक मूल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासोबतच समाजामध्ये धर्म, संस्कार, सेवा, एकता आणि राष्ट्रभक्तीची भावना रुजविण्यासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या भुसावळ येथील गौरक्षकांचा भडगाव येथे सन्मान करण्यात आला.

शनlचौक, भडगाव येथे रिद्धी सिद्धी बहुउद्देशीय गणेश मित्र मंडळ, भडगाव यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात गौरक्षक महिमा कोलते, वैभव वाघे आणि आदित्य धायडे (बल्लू भाऊ) यांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.

समाजसेवा, धर्मकार्य, गोसेवा तसेच विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांमध्ये निस्वार्थपणे योगदान देणाऱ्या गौरक्षकांच्या कार्याचे यावेळी कौतुक करण्यात आले. समाजहितासाठी सातत्याने कार्यरत राहून सेवा, समर्पण आणि धर्मकार्याप्रती निष्ठा जपणाऱ्या गौरक्षकांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

गौरक्षकांच्या कार्याचा अशा प्रकारे सन्मान झाल्याने त्यांच्या सेवेला प्रोत्साहन मिळाले असून, भविष्यातही समाजहितासाठी सेवा व विविध उपक्रम सुरू ठेवण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. गौरक्षकांच्या कार्यातून समाजात सेवा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ व्हावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.