मनजीया रेस्टाॅरंट,ललवाणी अॅग्रो टुरीझम च्या पर्यटकासाठी सेल्फी ची आणखी एक नवी पर्वणी -डि.वाय.एस.पी केदार बारबोले,अॅड.सुनील चोरडीया

भुसावळ(प्रतिनिधी)- येथून जवळच असलेल्या कुर्‍हे पानाचे येथील ललवाणी ऍग्रो टुरिझम  व मनजीया रेस्टॉरंट येथे येथील निसर्गरम्य परिसरामध्ये पर्यटकांसाठी सेल्फी पॉईंट व डेकोरेटेड सायकलचे पर्यटकार्पण भुसावळ विभागाचे पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले व नुकतेच पदोन्नती झालेले सहाय्यक संचालक व सरकारी अभियुक्त गृह विभाग अॅड सुनील चोरडिया यांच्या हस्ते करण्यात आले.

 केदार बारबोले यांनी या परिसरात आल्यानंतर माझ्या सर्व ताणतणाव निघून जाऊन मला एक सुखद अनुभूती आल्याचे प्रतिपादन केले. ललवाणी ऍग्रो टुरिझम खरोखरच पर्यटकांसाठी शांत, सुखद ,समाधानी पर्वणी असल्याचे नमूद केले.  जल, जमीन, आणि जंगल याचा इथे मेळ असल्याचे  नमूद केले .

नुकतेच जळगाव येथे सहाय्यक संचालक व सरकारी अभियंता गृह विभाग या पदावर पदोन्नती झालेले एडवोकेट सुनील चोरडिया यांचा अभिनंदन समारंभ हा निसर्गाच्या सानिध्यात व लेक व्ह्यु असलेल्या मनजीया रेस्टॉरंट मध्ये संपन्न झाला. याप्रसंगी चोरडीया यांनी ललवाणी परिवाराचे व तसेच यांनी मेहनतीने उभे केलेले नंदनवनाचे व फक्त आणि फक्त पर्यटकांनी सुखद अनुभव घ्यावा आपले सर्व दुःख विसरावे आणि निसर्गाच्या जवळ जाऊन येथेच मनमुराद आनंद घ्यावा इतकंच नव्हे तर खास खानदेशी जेवण आणि चवीचं रुचकर भोजनाची व्यवस्था व आरामदायी निवासाची व्यवस्था केल्यामुळे त्यांनी त्यांचे कौतुक केले.

 ललवानी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा.डी.एम. ललवाणी यांनी केदार बारबोले व सुनील चोरडिया यांचा शाल, पुष्पगुच्छ, गोमाता ची मूर्ती ,व घरट्यातून आकाशाकडे हे पुस्तक भेट देऊन त्यांचा सन्मान व सत्कार केला. ललवाणी यांनी आपल्या मनोगतातून उभयंतांनी या क्षेत्राला भेट दिली त्याबद्दल आभार व्यक्त केले.  ऍग्रो टुरिझमच्या निर्मितीसाठी ची परिस्थिती व हे का निर्माण केलं याविषयी आपलं मत व्यक्त केलं. 

याप्रसंगी भुसावळ, जळगाव, मुक्ताईनगर, बोदवड ,जामनेर, रावेर, यावल येथील अतिरिक्त सरकारी वकील, सहाय्यक सरकारी वकील व विशेष सरकारी वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.  या अभिनंदन समारंभासाठी एडवोकेट मोहन देशपांडे , राजीव तडवी, भूषण भामरे, रवींद्र रोकडे, कृतिका भट,  कल्पेश देशमुख आदींनी सहकार्य केले.

कार्यक्रमानंतर सर्व वकीलांनी ट्रॅक्टर  फेरी,शिवार माहीती व गोमाता अभीवादन करुन मनसोक्तपणे फोटोसेशन केले.