भुसावळ (प्रतिनिधी) : सूर्यकन्या माता तापी नदीच्या जन्मोत्सवानिमित्त येथील तापी उत्थान समितीतर्फे भुसावळात विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात सोमवारी, दि. २० जुलै रोजी आषाढ शुद्ध सप्तमीच्या दिवशी छट पूजन घाट येथे तापीमातेचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला .
यावेळी दाम्पत्यांच्या हस्ते तापीमातेचे विधिवत व शास्त्रोक्त पद्धतीने पूजन करण्यात आले. भाविकांच्या वतीने तापीमातेला साडी, खण, नारळ, पुष्पहार तसेच सौभाग्यलेणी अर्पण करून श्रद्धाभावाने ओटी भरण्यात आली. यानंतर महाआरती व भजनाचा कार्यक्रम पार पडला. . प्रसंगी तापी उत्थान समिती अध्यक्ष भारती वैष्णव,राणी ठाकूर सोनम ठाकूर , राजेश्री चौधरी ,भारती पाटील, रंजना पाटील, चौधरी ,शारदा चौरसिया, आरती चौरसिया, संगीता टोके ,सुषमा राणे ,संतोष टाक, दिलीप टाक, अनुराधा टाक, जय प्रकाश शुक्ला साजन टाक, आदींसह शहरातील विविध भागांतून मोठ्या संख्येने महिला व भाविक भक्त या जन्मोत्सव सोहळ्यात सहभागी झाले होते.
चौकट.....
बडा हनुमान मंदिराचे स्वर्गीय महंत प्रशांतजी वैष्णव यांनी सुमारे २५ वर्षांपूर्वी तापी नदी जन्मोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू केली होती. आजही ही परंपरा व श्रद्धेची धुरा त्यांच्या भगिनी समिती अध्यक्ष भारती वैष्णव तसेच भाविक भक्तांकडून मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने पुढे सुरू ठेवली जात आहे.याच परंपरेनुसार आषाढ शुद्ध सप्तमीच्या पावन दिनी तापी नदी किनारी छट पूजन घाट येथे सूर्यकन्या माता तापीचा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला.