ताप्ती पब्लिक स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के; ३२ विद्यार्थ्यांना १० CGPA ;श्रेयांश सिंग ९७.२ टक्के गुणांसह शाळेत प्रथम; गुणवंत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

भुसावळ (प्रतिनिधी) : येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, शाळेने यंदाही १०० टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. परीक्षेसाठी बसलेले शाळेतील सर्व २३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे तब्बल ३२ विद्यार्थ्यांनी १० CGPA मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.

यंदाच्या परीक्षेत श्रेयांश लक्ष्मीनारायण सिंग याने ९७.२ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. हर्ष संजय छाबडिया व अनिश महेश चौधरी यांनी प्रत्येकी ९६.६ टक्के गुण मिळवत संयुक्तपणे द्वितीय क्रमांक मिळविला. साहिल हेमंत महाजन याने ९६ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला.

स्वरदा शेखर केऱ्हाळकर हिने ९४.८ टक्के गुण मिळवत चौथा क्रमांक मिळविला, तर अन्वी उदय गोसावी व रणवीर जयसिंग महाजन यांनी प्रत्येकी ९४.६ टक्के गुण मिळवत संयुक्तपणे पाचवा क्रमांक मिळविला.

या यशाबद्दल ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक, चेअरमन महेश फालक, सचिव विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजय नाहाटा, प्राचार्या निना कटलर तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.