भुसावळ ( प्रतिनिधी )- भुसावळ शहरात नगरपरिषदेने केलेल्या एका मोठ्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. नगरपरिषदेच्या पथकाने अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संतोषी माता हॉलवर कारवाई करत हॉल सील केला. नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर नियमानुसार कारवाई करत हॉलच्या मुख्य प्रवेशद्वाराला सील ठोकण्यात आले. या कारवाईची माहिती मिळताच परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होऊन चर्चेला उधाण आले होते. दरम्यान, संतोषी माता हॉलवर नेमकी कोणत्या कारणामुळे कारवाई करण्यात आली, याबाबत शहरवासीयांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. संबंधित पक्ष या कारवाईबाबत आपली बाजू मांडणार का, तसेच नगरपरिषद प्रशासनाकडून पुढे कोणती कारवाई केली जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नगरपरिषदेच्या या कारवाईमुळे संपूर्ण भुसावळ शहरात चर्चेला उधाण आले असून, या प्रकरणातील पुढील घडामोडींची शहरवासीयांना प्रतीक्षा आहे.


