भुसावळ (प्रतिनिधी)-: महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना वाढदिवसानिमित्त विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

याप्रसंगी भाजप उद्योग आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा बियाणी एज्युकेशन ग्रुपचे चेअरमन मनोज बियाणी यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि यशस्वी सार्वजनिक जीवनासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
यावेळी मनोज बियाणी यांच्यासमवेत राजेश पारिक, नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर, भाजप शहराध्यक्ष किरण कोलते, निक्की बत्रा, रुपेश देशमुख, आकाश राजपूत, निखिल वाणी, करण राजपूत यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना पुष्पगुच्छ अर्पण करून त्यांचे अभीष्टचिंतन केले व वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
फोटो कॅप्शन – महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना भाजपा उद्योग आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व बियाणी एज्युकेशन ग्रुपचे चेअरमन मनोज बियाणी सोबत राजेश पारिक,नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर,भाजपा शहर अध्यक्ष किरण कोलते,निक्की बत्रा,रुपेश देशमुख,आकाश राजपूत,निखिल वाणी,करण राजपूत व इतर.


