बऱ्हाटे शैक्षणिक संकुलात स्व. काकासाहेब पुंडलिक गणपत बऱ्हाटे यांची जयंती उत्साहात साजरी

भुसावळ (प्रतिनिधी) – बऱ्हाटे शैक्षणिक संकुलात शनिवार, दि. ७ नोव्हेंबर २०२६ रोजी संस्थेचे आधारस्तंभ स्वर्गीय काकासाहेब पुंडलिक गणपत बऱ्हाटे यांची जयंती मोठ्या उत्साहात भावपूर्ण व भक्तिमय  वातावरणात साजरी करण्यात आली.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष  परीक्षितभाऊ बऱ्हाटे यांनी सहपरिवार स्व. काकासाहेब पुंडलिक गणपत बऱ्हाटे यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर संस्थेचे सचिव  एस. डी. बऱ्हाटे सर, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. जे. चौधरी सर, प्राथमिक विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका हेमांगिनी चौधरी मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गुलाबपुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

या प्रसंगी मुख्याध्यापिका हेमांगिनी चौधरी, सुनीता बऱ्हाटे आणि चैताली पाचपांडे यांनी भक्तिमय भजनांचे सादरीकरण केले. भजनांमुळे कार्यक्रमाला भक्तिमय वातावरणाची रंगत प्राप्त झाली.

संस्थेच्या उभारणीत आणि शैक्षणिक वाटचालीत मोलाचे योगदान देणाऱ्या स्व. काकासाहेब पुंडलिक गणपत बऱ्हाटे यांच्या स्मृतींना यावेळी उजाळा देण्यात आला. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला .उत्साहपूर्ण आणि भावपूर्ण वातावरणात कार्यक्रम पार पडला.