भुसावळ (प्रतिनिधी) : भारतीय संविधानाचे शिल्पकार, महान विचारवंत व सामाजिक समतेचे पुरस्कर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भारतीय जनता पार्टी, भुसावळ शहराच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

रेल्वे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना. श्री. संजय सावकारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करत समाजासाठी दिलेल्या त्यांच्या अमूल्य योगदानाचे स्मरण केले. तसेच “जय भीम” व “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो” या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, उपनगराध्यक्ष शैलजा नारखेडे, गटनेते युवराज लोणारी व मनोज बियाणी उपस्थित होते.
पक्ष पदाधिकाऱ्यांमध्ये भाजपा उत्तर शहराध्यक्ष संदीप सुरवाडे, दक्षिण शहराध्यक्ष किरण कोलते, शहर सरचिटणीस पवन बुंदेले, सागर चौधरी, जयंत माहुरकर, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष संतोष ठोकळ व रविंद्र दाभाडे आदींचा समावेश होता.
नगरसेवकांमध्ये गिरीश महाजन, राजेंद्र आवटे, निक्की बत्रा, विशाल नाटकर, शोभा रणधीर, सीमा नरवाडे, पूजा तायडे, अर्चना सातदिवे व सोनल महाजन उपस्थित होते.
तसेच इतर मान्यवर व कार्यकर्त्यांमध्ये पुरुषोत्तम नारखेडे, विलास सातदिवे, बोधराज चौधरी, राजेंद्र नाटकर, कैलास चौधरी, अल्बर्ट तायडे, श्रेयस इंगळे, रुपेश देशमुख, नारायण रणधीर, गुड्डू अग्रवाल, राहुल तायडे, गौरव वाघ, धनराज बाविस्कर, अनिता आंबेकर,अलका शेळके, सविता मकासरे, लक्ष्मी मकासरे, शंकर शेळके, प्रशांत नरवाडे, प्रशांत पाटील, सुमित बऱ्हाटे, सुनिल धीवरे, कैलास शेलोडे, गोपी राजपूत, मनीष पाटील, सागर जाधव, प्रसिद्धी प्रमुख गोकुळ बाविस्कर, रहमान शेख आदी उपस्थित होते.
कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.



