भुसावळ (प्रतिनिधी ) – भारतरत्न, विश्वरत्न, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त भुसावळ येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पमाळ अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी डॉ. आंबेडकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि संविधानिक योगदानाचा गौरव करत त्यांच्या विचारांचे अनुसरण करण्याचा संकल्प व्यक्त केला.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सचिव प्रवीण सुरवाडे, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मुनवर खान, प्रभाग क्रमांक 3 च्या नगरसेविका काजल मोरे, माजी नगरसेवक अहमद कुरेशी, इस्माईल पहलवान गवळी, प्रदीप नेहते, रहीम कुरेशी, नितीन पटाव, साजिद भाई, पवन बहिरुणे, राहुल बिराडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम शांततापूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.


