भुसावळत विवाहितेचा विनयभंग ; एका विरुद्ध गुन्हा दाखल:

भुसावळ : शहरातील घरातील सामान घेण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संबंधित दीराविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजेच्या सुमारास जामनेर रोडवरील सावकारेचे घरातील सामान घेण्यासाठी गेल्या होत्या.

इमारतीच्या जिन्याच्या गेटला कुलूप असल्यानेत्यांनी तेथे उपस्थित असलेल्या दीराकडे चावीची मागणी केली. मात्र, त्याने चावी देण्यास नकार देत शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली.सावकारे यावेळी आरोपी मयूर संजयकुमार सावकारे (रा. सावकारे बिल्डिंग, जामनेर रोड) याने पीडित महिलेचा हात पकडून जबरदस्ती ओढत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे तक्रारीत नमूद आहे. घाबरलेल्या महिलेने

. घाबरलेल्या पीडित महिलेने आरडाओरड करत स्वतःची सुटका करून घेत ‘११२’ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर महिलेने बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आरोपीविरुद्ध विनयभंग व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षपा राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल तेजस पारसकर करीत आहेत.घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर महिलेने बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आरोपीविरुद्ध विनयभंग व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.