भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील बियाणी पब्लिक स्कूलमध्ये क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

दि. ११ रोजी आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे प्राचार्य डी. एम. पाटील यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी शाळेतील सहशिक्षिका मानसी पाटील व हिना पटेल यांनी विद्यार्थ्यांना महात्मा फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली.
जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा तसेच चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


