भुसावळमध्ये दावत-ए-इस्लामी इंडिया तर्फे जिल्हास्तरीय हज कॅम्प यशस्वी

भुसावळ (प्रतिनिधी ) –

दावत-ए-इस्लामी इंडिया यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हज-ओ-उमरा विभागामार्फत हज आणि उमरा यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी जिल्हास्तरीय हज प्रशिक्षण शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

या प्रशिक्षण शिबिरात मुंबई येथून आलेले हाजी अबु बकर साहेब, संस्थेचे जिल्हाध्यक्ष जुबैर अत्तारी तसेच मौलाना जुल्फिकार मिस्बाही यांनी उपस्थित हज यात्रेकरूंना हजचे नियम, अरकान आणि आवश्यक मार्गदर्शन केले. त्यांनी हज यात्रेचे महत्त्व स्पष्ट करताना भाविकांना योग्य तयारी आणि शिस्त पाळण्याचे आवाहन केले.

सदर शिबिर मुस्लिम कॉलनी, खडका रोड येथील ताज हॉलमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडले. कार्यक्रमादरम्यान महिलांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच सर्व उपस्थित पाहुणे आणि यात्रेकरूंसाठी भोजनाची योग्य व्यवस्था करण्यात आली होती.

या शिबिरात जिल्हाभरातून मोठ्या संख्येने हज यात्रेकरूंनी सहभाग नोंदवून मार्गदर्शनाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शोएब अत्तारी, हाजी शाकिर कादरी, अझहर कादरी, हाजी जमीर अत्तारी, अब्दुल सईद, हाजी तनवीर अत्तारी, फरीद शेख, जहांगीर शेख, साबिर मनियार तसेच GNRF चे जिल्हाध्यक्ष रफीक रोशन कादरी यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल आयोजकांनी समाधान व्यक्त केले असून पुढील काळातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचा मानस व्यक्त केला आहे.