भुसावळ (प्रतिनिधी) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) गट-क परीक्षेत भुसावळ येथील हर्षल विजयसिंग पाटील यांनी उल्लेखनीय यश संपादन करत राज्यात इडब्ल्यूएस प्रवर्गातून ५ वा क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या उज्ज्वल यशामुळे त्यांची कर सहाय्यक पदावर निवड झाली आहे.

हर्षल पाटील हे भुसावळ शहरातील सरदार पटेल हाउसिंग सोसायटी, 15 बंगला परिसरातील रहिवासी असून ते विजयसिंह पाटील व छाया पाटील यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या या यशामुळे कुटुंबीय, नातेवाईक तसेच परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हर्षल यांच्या यशाबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या परिश्रम, चिकाटी आणि जिद्दीचे सर्वत्र कौतुक केले जात असून, त्यांच्या या कामगिरीमुळे परिसरातील विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.


