होळी विशेष: मध्य रेल्वेकडून मुंबई–मडगाव/हटिया व पुणे–दानापूर दरम्यान १८ अतिरिक्त गाड्या

मुंबई ( प्रतिनिधी ) –

होळी सणाच्या पार्श्वभूमीवर वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई–मडगाव/हटिया तसेच पुणे–दानापूर मार्गांवर एकूण १८ अतिरिक्त विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष सेवांमुळे कोकण, विदर्भ, झारखंड आणि बिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

(१) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मडगांव वातानुकूलित विशेष (४ सेवा)

01049 विशेष – दि. 03 व 06 मार्च 2026 रोजी 00.30 वाजता सुटेल; मडगाव येथे 13.30 वाजता आगमन.
01050 विशेष – दि. 03 व 06 मार्च 2026 रोजी 16.30 वाजता मडगावहून सुटेल; दुसऱ्या दिवशी 05.20 वाजता मुंबई आगमन.

थांबे: दादर, ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी, करमळी आदी.
संरचना: १८ एसी तृतीय इकॉनॉमी + २ जनरेटर व्हॅन.

(२) लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगांव विशेष (४ सेवा)

01047 विशेष – दि. 28 फेब्रुवारी व 07 मार्च 2026 रोजी 22.15 वाजता सुटेल; दुसऱ्या दिवशी 12.00 वाजता मडगाव आगमन.
01048 विशेष – दि. 01 व 08 मार्च 2026 रोजी 18.00 वाजता मडगावहून सुटेल; दुसऱ्या दिवशी 06.50 वाजता मुंबई आगमन.

संरचना: १ एसी द्वितीय, ६ एसी तृतीय, ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय, १ गार्ड ब्रेक व्हॅन, १ जनरेटर व्हॅन.

(३) लोकमान्य टिळक टर्मिनस – हटिया विशेष (४ सेवा)

08610 विशेष – दि. 04 व 11 मार्च 2026 रोजी 05.00 वाजता सुटेल; दुसऱ्या दिवशी 18.00 वाजता हटिया आगमन.
08609 विशेष – दि. 02 व 09 मार्च 2026 रोजी 16.20 वाजता हटियाहून सुटेल; तिसऱ्या दिवशी 00.40 वाजता मुंबई आगमन.

महत्त्वाचे थांबे: कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, नागपूर, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राउरकेला.
संरचना: २ एसी द्वितीय, ५ एसी तृतीय, २ एसी तृतीय इकॉनॉमी, ७ शयनयान, ४ सामान्य द्वितीय, १ गार्ड ब्रेक व्हॅन, १ जनरेटर व्हॅन.

(४) पुणे – दानापूर विशेष (६ सेवा)

01479 विशेष – दि. 01, 05 व 09 मार्च 2026 रोजी 19.55 वाजता सुटेल; तिसऱ्या दिवशी 08.00 वाजता दानापूर आगमन.
01480 विशेष – दि. 03, 07 व 11 मार्च 2026 रोजी 10.00 वाजता दानापूरहून सुटेल; दुसऱ्या दिवशी 18.15 वाजता पुणे आगमन.

महत्त्वाचे थांबे: दौंड कॉर्ड लाईन, मनमाड, भुसावळ, इटारसी, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा.
संरचना: १ एसी प्रथम, १ एसी द्वितीय, १ एसी तृतीय, ११ शयनयान, ५ सामान्य द्वितीय, २ गार्ड ब्रेक व्हॅन.

आरक्षण व बुकिंग

ट्रेन क्रमांक 01047, 01049 आणि 01479 या गाड्यांचे आरक्षण सुरू असून 08610 विशेषसाठी बुकिंग 02 मार्च 2026 पासून सुरू होणार आहे. आरक्षण सर्व संगणकीकृत केंद्रांवर तसेच IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.

अनारक्षित डब्यांसाठी तिकिटे UTS प्रणालीद्वारे घेता येतील. तसेच RailOne अ‍ॅपद्वारे बुकिंग करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. गाड्यांच्या सविस्तर वेळापत्रकासाठी www.enquiry.indianrail.gov.in किंवा NTES अ‍ॅपचा वापर करण्याचे सूचित करण्यात आले आहे.

होळीच्या निमित्ताने जादा विशेष गाड्या सुरू केल्यामुळे प्रवाशांची गर्दी कमी होऊन सुलभ प्रवासास मदत होणार आहे.