होळी निमित्त रेल्वेकडून भुसावळ–खंडवा व देवलाली–नवी अमरावती दरम्यान अनारक्षित मेमू विशेष गाड्या

भुसावळ ( प्रतिनिधी) –

होळीच्या पावन सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन भारतीय रेल्वे प्रशासनाने भुसावळ–खंडवा तसेच देवलाली–नवी अमरावती दरम्यान अनारक्षित मेमू (MEMU) विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना सुरक्षित, सुलभ व आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे हा या विशेष गाड्यांचा उद्देश आहे.

१) भुसावळ – खंडवा अनारक्षित मेमू विशेष (६ फेऱ्या)

गाडी क्रमांक 01102 (अनारक्षित विशेष)
दि. 02, 03 व 04 मार्च 2026 रोजी भुसावळ येथून सकाळी 05.50 वाजता सुटेल व खंडवा येथे सकाळी 07.55 वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 01101 (अनारक्षित विशेष)
दि. 01, 02 व 03 मार्च 2026 रोजी खंडवा येथून सायं. 17.10 वाजता सुटेल व भुसावळ येथे रात्री 20.00 वाजता पोहोचेल.

ठहराव: नेपानगर, बुरहानपूर, रावेर, निंभोरा व सावदा
रचना: ८ मेमू डबे

२) देवलाली – नवी अमरावती अनारक्षित मेमू विशेष (६ फेऱ्या)

गाडी क्रमांक 01103 (अनारक्षित विशेष)
दि. 02, 03 व 04 मार्च 2026 रोजी देवलाली येथून दुपारी 13.35 वाजता सुटेल व नवी अमरावती येथे रात्री 21.30 वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 01104 (अनारक्षित विशेष)
दि. 03, 04 व 05 मार्च 2026 रोजी नवी अमरावती येथून पहाटे 05.20 वाजता सुटेल व देवलाली येथे दुपारी 12.40 वाजता पोहोचेल.

ठहराव: नाशिक रोड, निफाड, लासलगाव, मनमाड, नांदगाव, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, बोडवड, मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर व बडनेरा
रचना: १२ मेमू डबे

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अनारक्षित तिकीट बुकिंगसाठी RailOne अ‍ॅप डाउनलोड करण्याचे आवाहन केले आहे. तसेच गाड्यांच्या सविस्तर वेळापत्रकासाठी अधिकृत संकेतस्थळ www.enquiry.indianrail.gov.in ला भेट देण्याचे किंवा NTES अ‍ॅपचा वापर करण्याचेही सुचविले आहे.

होळीच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या या विशेष गाड्यांमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.