जळगाव (प्रतिनिधी ) नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव, आयकॉन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व मू. जे. महाविद्यालय इव्हेंट मॅनेजमेंट विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २२ फेब्रुवारी रोजी “आठवणीतील लतादीदी” हा सुरेल कार्यक्रम उत्साहात पार पडला.

भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या हिंदी व मराठी सदाबहार गीतांनी उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमात जळगावच्या संगीत क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींचा सन्मानही करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी महापौर दीपमाला काळे व माजी महापौर सीमाताई भोळे उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मोहन शुक्ला, माजी जि.प. सदस्य डॉ. हर्षल माने, उद्योजक रमेशकुमार मुनोत, डिव्हाईन फ्लाय टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या संचालिका निलिमा नायर, डॉ. चंद्रशेखर पाटील, नगरसेवक, बोली स्टुडिओचे संचालक प्रशांत सोनवणे, के.सी.ई. सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर तसेच संस्थेच्या अध्यक्षा सौ. मनिषाताई पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रतनकुमार थोरात यांनी केले. अमित माळी, विकास जंजाळे, ऐश्वर्या परदेशी, अंजली धुमाळ व संघपाल तायडे यांनी लतादीदींची गीते सादर करून वातावरण भारावून टाकले.
यावेळी आर.डी. पाटील, सुनंदा चौधरी, वर्षा चौधरी, संगीता शाह, संघपाल तायडे व जाकिर खान यांना संगीत क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेची संपूर्ण टीम, पंकज कासार तसेच इव्हेंट मॅनेजमेंट विभागाने परिश्रम घेतले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते.


