भुसावळ (प्रतिनिधी): भुसावळ तालुका मेडिकल असोसिएशन तर्फे मेडिकल क्षेत्रातील ज्येष्ठ व श्रेष्ठ पदाधिकारी सुनील भंगाळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम कुर्हे पानाचे येथील स्वर्गीय स्वप्निल स्मृती गोकुळ ग्राम येथे आयोजित करण्यात आला होता.

यावेळी गोमातांना चारा, गूळ, ढेप व मकाचुनी खाऊ घालून गोसेवा करण्यात आली तसेच गोपूजनही करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी गोकुळ ग्राम येथील स्वच्छ, नैसर्गिक व नयनरम्य वातावरणाचे कौतुक केले.
ज्येष्ठ सदस्य राजाभाऊ काबरा यांनी गोशाळेबाबत गौरवोद्गार काढत येथे जतन केलेल्या देशी गाई व गोपरिक्रमा मार्गाबद्दल समाधान व्यक्त केले. ललवाणी फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. डी. एम. ललवाणी यांच्या गोसेवेबद्दल विशेष आभार मानण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटन सचिव अतुल ताथेड यांनी परिश्रम घेतले. असोसिएशनचे अध्यक्ष तिलक फालक यांनी गोशाळेत कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल तसेच उपस्थित सर्व सभासदांचे आभार व्यक्त केले.
याप्रसंगी जिल्हा कार्यकारिणी सदस्य अविनाश महाजन, माजी तालुकाप्रमुख राजाभाऊ काबरा, माजी उपाध्यक्ष ईश्वर चौधरी, श्रीकांत पाटील, प्रदीप पाचपांडे, विजय रायपुरे, निलेश बडगुजर, नानक बुधरानी, घनश्याम नागदेव आदी सभासद उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी परिसराची पाहणी करून स्वच्छता व सुंदर वातावरणाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच महावीर मेडिकलचे संचालक व समाजसेवी अतुल ताथेड यांनीही यापूर्वी आपला वाढदिवस कुटुंबासमवेत गोमातांच्या सान्निध्यात गोपूजन व गोसेवा करून साजरा केल्याचे नमूद करण्यात आले.



