वलसाड–दानापूर दरम्यान होळी विशेष सुपरफास्ट गाडी

भुसावळ (प्रतिनिधी ) : होळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन भारतीय रेल्वे प्रशासनाने वलसाड ते दानापूर दरम्यान विशेष साप्ताहिक सुपरफास्ट गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

ट्रेन क्रमांक ०९०२५ विशेष साप्ताहिक सुपरफास्ट गाडी दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ ते ३० मार्च २०२६ पर्यंत वलसाड येथून दर सोमवारी सकाळी ०८.४० वाजता सुटणार असून दुसऱ्या दिवशी दुपारी १२.०० वाजता दानापूर येथे पोहोचेल.

तसेच ट्रेन क्रमांक ०९०२६ विशेष साप्ताहिक सुपरफास्ट गाडी दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ ते ३१ मार्च २०२६ पर्यंत दानापूर येथून दर मंगळवारी दुपारी १४.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री २१.३० वाजता वलसाड येथे पोहोचेल.

ही विशेष गाडी भेस्थान, नंदुरबार, भुसावल, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, पंडित दिनदयाल उपाध्याय, बक्सर आणि आरा या स्थानकांवर थांबणार आहे.

गाडीची संरचना :
१ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, ३ वातानुकूलित तृतीय श्रेणी, १२ शयनयान, २ सामान्य द्वितीय आणि २ सामान्य द्वितीयसह गार्ड ब्रेक व्हॅन असे डबे असतील.

प्रवाशांनी तिकीट आरक्षणासाठी अधिकृत ॲपचा वापर करावा. विशेष गाड्यांच्या सविस्तर वेळापत्रकासाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला किंवा NTES ॲपला भेट द्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.