चिखला घटनेच्या निषेधार्थ. भुसावळ मराठा समाजातर्फे तीव्र निषेध : प्रांतांना निवेदन :

भुसावळ (प्रतिनिधी )- बुलढाणा जिल्ह्यातील चिखला गावामध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज दिनांक २३ फेब्रुवारी सोमवार रोजी. येथील प्रांत कार्यालयात मराठा समाजाच्यावतीने निवेदन देण्यात आले.

चिखला (ता. बुलढाणा) येथे घडलेल्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर विविध समाज बांधवांनी एकत्र येत तीव्र निषेध व्यक्त केला. यावेळी संबंधित घटनेचा निषेध नोंदवून प्रशासनाने तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

या प्रसंगी सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच इतर विविध संघटनांनीही आपापली निवेदने सादर करून घटनेचा निषेध नोंदविला.

प्रशासनाने या निवेदनाची दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी यावेळी उपस्थितांकडून करण्यात आली.