भुसावळात योगिश्वर याज्ञवल्क्य महर्षी यांची जयंती उत्साहात साजरी

भुसावळ (प्रतिनिधी ) – रविवार, दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी फाल्गुन शुद्ध पंचमी निमित्त ब्राह्मण संघात योगिश्वर याज्ञवल्क्य महर्षी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात ब्राह्मण संघाचे अध्यक्ष गणेश वढवेकर यांच्या हस्ते याज्ञवल्क्य महर्षी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून झाली. यानंतर जेष्ठ सदस्य श्री. सुरेशराव कुलकर्णी यांनी याज्ञवल्क्य महर्षी यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात आढावा घेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी त्यांच्या वैदिक ज्ञानपरंपरेतील योगदानावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमात आरती करण्यात आली तसेच उपस्थितांना प्रसाद वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे वातावरण भक्तिमय व उत्साही होते.

या प्रसंगी संघाचे सचिव महेंद्र गोडबोले, उपाध्यक्ष गजानन जोशी, कोषाध्यक्ष अमोद टेम्भूर्णीकर, जयंत जोशी, संजय बोचरे, विकी इंगळे, अशोक पाटील, सौ. टेम्भूर्णीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन ब्राह्मण संघाच्या वतीने करण्यात आले.