भुसावळ (प्रतिनिधी):
शहरातील मातृभूमी चौक परिसरात असलेल्या सुराणा स्वाध्याय भवनात विश्वशांतीसाठी विशेष महामांगलिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. परम पूजनीय मेवाड भूषण स्वर्गीय प्रताप मुनिजी महाराज यांचे सुशिष्य तसेच जिनशासन प्रभावक उपाध्याय प्रवर गुरुदेव डॉ. गौतम मुनीजी महाराज यांच्या ठाणे-दोन यांच्या पावन सान्निध्यात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

नवीन वर्षाच्या निमित्ताने १जानेवारी रोजी सकाळी ९ ते १० या वेळेत विश्वशांतीसाठी महामांगलिक व जप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांना गुरु दर्शन व प्रवचनाचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे.
या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी सर्व जैन बांधव-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जैन श्री संघातर्फे संघपती जयंतीलाल सुराणा (जे. बी. कोटेचा), कांतीलाल चोरडिया, गौतम चोरडिया, अतुल ताथेड, राजेश बाफना आणि विनोद मेहता यांनी केले आहे.


