भुसावळ नाहाटा महाविद्यालयात वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमांवरील मार्गदर्शन कार्यक्रम :

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ कला, विज्ञान व पू. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय येथे वाणिज्य व व्यवस्थापन विभाग तसेच माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने वाणिज्य शाखेतील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमांतील (CA, CS, CMA) संधी या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन २ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी भुसावळ येथील सुप्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट श्री. मुकेशजी अग्रवाल हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. सदर मार्गदर्शन कार्यक्रमासाठी कोणतेही नोंदणी शुल्क आकारण्यात येणार नाही.

तरी भुसावळ शहरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.